मुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक

मुंबई | भारताचा माजी आॅफ स्पिनर गोलंदाज रमेश पोवारला भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षपदाबद्दल मुदतवाढ देण्यात आली आहे.

हे प्रशिक्षकपद नोव्हेंबर २०१८मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकापर्यंत असणार आहे.

रमेश पोवारकडे जूलै महिन्यात भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणुन नेमण्यात आले होते. तेव्हाचे प्रशिक्षक तुषार आरोटे यांना कोणतेही कारण न देता प्रशिक्षकपदावरुन काढण्यात आले होते तसेच त्यांना कोणतेही अपिल करण्याची संधी देण्यात आली नव्हती.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने पोवार यांना ही मुदतवाढ दिली आहे परंतु याबद्दल अजून कोणतीही माहिती माध्यमांना देण्यात आली नाही.

पोवार जूलैपुर्वी आॅस्ट्रेलियामध्ये प्रशिक्षकपदाचा Level-III दर्जाचा कोर्स करण्यासाठी गेले होते. त्यांनी प्रशिक्षक पदाचा कोणताही अनुभव नाही. परंतु वेळ नसल्यामुळे त्यांना लगेच प्रभारी प्रशिक्षकपदी नेमण्यात आली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

मोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा

तब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम

कर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण