आणि त्याने वयाच्या ४१व्या वर्षी घेतली कसोटी क्रिकेटमध्ये विकेट

गाॅल | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला आज सुरुवात झाली. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात आज रंगाना हेराथने कसोटी क्रिकेटमधील मोठा पराक्रम केला.

वयाच्या ४०व्या वर्षी कसोटीत विकेट घेण्याचा पराक्रम त्याने केला आहे. आज रंगाना हेराथचे वय ४० वर्ष आणि २३२ दिवस आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेणारा तो १९९४नंतरचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

त्याने आज जो रुटची विकेट घेत हा पराक्रम केला. गाॅल मैदानावरील त्याची रुट १००वी विकेट ठरला.

४१ वर्ष आणि १२५ दिवसांचे असताना ग्रॅहम गुचने ब्रिस्बेन कसोटीत १९९४मध्ये विकेट घेतली होती.
१९९९ला हेराथ गाॅलवरच आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर मुरलीधरनच्या निवृत्तीनंतर तो श्रीलंका संघाचा पुर्णवेळ सदस्य झाला होता.

या दिग्गज ४० वर्षीय खेळाडूने कसोटीत आजपर्यंत ९३ सामन्यात ४३१ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सध्या संयुक्तपणे ९व्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी क्रिकेटमध्ये आज इतिहास घडला, रंगना हेराथचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले जाणार

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात खेळण्याचा अजिंक्य रहाणेने व्यक्त केला विश्वास

धोनी, विराटलाही जे जमले नाही ते रोहित शर्माला करण्याची संधी

एकही चेंडू न टाकता विराटने घेतली होती पहिली टी20 विकेट

बर्थडेच्या दिवशीच पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराटचा विक्रम