रणजी ट्रॉफी: महाराष्ट्राला रेल्वेचे चोख प्रतिउत्तर !

पुणे। येथील एमसीए स्टेडिअमवर सुरु असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे संघात सुरु असलेल्या रणजी सामन्यात रेल्वेने महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील सर्वबाद ४८१ धावांना तिसऱ्या दिवसाखेर ५ बाद ३३० धावा करत चोख प्रतिउत्तर दिले आहे.

रेल्वेने आज बिनबाद ८८ धावांवरून सुरुवात केली. रेल्वेकडून आज शिवकांत शुक्ला(६२), प्रथम सिंग(७३) आणि नितीन भिल्ले(५६) यांनी अर्धशतके केली. त्याचबरोबर सौरभ वकासकार(३३) आणि कर्णधार महेश रावत(१८) यांना विशेष काही करता आले नाही.

सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर अरिंदम घोष(४४*) आणि मनीष राव(१९*) हे नाबाद खेळत आहेत.

महाराष्ट्राकडून निकित धुमाळ(७२/१), मुकेश चौधरी(७१/१) ,प्रदीप दधे(५६/१) आणि चिराग खुराणा(५०/२) यांनी बळी घेतले.

तत्पूर्वी काल महाराष्ट्राने सर्वबाद ४८१ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून रोहित मोटवानीने(१८९) शतक केले होते.

संक्षिप्त धावफलक:
महाराष्ट्र पहिला डाव: सर्वबाद ४८१ धावा
बडोदा पहिला डाव : ५ बाद ३३० धावा
अरिंदम घोष(४४*) आणि मनीष राव(१९*) हे खेळत आहेत.