रणजी ट्रॉफी: महाराष्ट्र सर्वबाद ४८१ धावा, रेल्वेच्या दुसऱ्या दिवसाखेर बिनबाद ८८ धावा !

पुणे। येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे रणजी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर महाराष्ट्राने सर्वबाद ४८१ धावा केल्या आहेत तर रेल्वेने बिनबाद ८८ धावा केल्या आहेत. महाराष्ट्राकडून रोहित मोटवानीने शतक केले आहे.

महाराष्ट्राने केलेल्या ४८१ धावांचे प्रतिउत्तर देताना रेल्वेने सुरवात चांगली केली आहे. त्यांचे सलामीवीर सौरभ वकासकर(३२) आणि शिवकांत शुक्ला(४७) हे नाबाद खेळत आहेत.

तत्पूर्वी महाराष्ट्राने कालच्या ५ बाद २४९ धावांपासून पुढे खेळताना चांगला खेळ केला. काल नाबाद असलेली जोडी रोहित मोटवानी आणि चिराग खुराणा यांनी आज सुरवात चांगली केली होती परंतु चिराग खुराणा २२ धावांवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ लगेचच निकित धुमाळ ४ धावांवर बाद झाला.

त्यानंतर महाराष्ट्राची अवस्था ७ बाद २८७ अशी झाली. परंतु रोहितने मात्र त्याचा खेळ पुढे चालू ठेवला होता त्याने शतकी खेळी केली. त्याच्या १८९ धावांच्या खेळीत त्याने २४ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याने मुकेश चौधरी(२५), प्रदीप दधे(२६) आणि समद फल्लाह(१४*) या तळ्यातल्या फलंदाजांना साथीला घेत मुंबईला ४८१ धावांचा टप्पा गाठून दिला. त्याला अमित मिश्राने प्रताप सिंग करवी झेलबाद केले.

रेल्वेकडून अमित मिश्रा आणि करण ठाकूर यांनी प्रत्येकी ४ बळी घेतले. तसेच अनुरीत सिंग आणि मनीष राव यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक:
महाराष्ट्र पहिला डाव: सर्वबाद ४८१ धावा
बडोदा पहिला डाव : बिनबाद ८८ धावा
सौरभ वकासकर(३२) आणि शिवकांत शुक्ला(४७) खेळत आहेत.