म्हणून अजिंक्य रहाणे खेळणार नाही रणजी ट्रॉफीचा पहिला सामना

मुंबई । मुंबई संघाचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी अजिंक्य रहाणे मुंबईचा रणजी ट्रॉफीचा पहिला सामना खेळणार नसल्याचे सांगितले आहे. रहाणेने मुंबई क्रिकेट असोशिएशनला आपण या सामन्यासाठी उपलब्ध नसणार असल्याचे कळवले आहे.

रहाणे सध्या पत्नी राधिका रहाणेबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात गेला आहे. अजिंक्य राहणे हा सेशेल्स या देशात आहे. 

रहाणे या सामन्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे मुंबई रणजी संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई रणजी संघ यावर्षीच्या स्पर्धेकडे ४२ वे विजेतेपद मिळवण्याच्या दृष्टीने पाहत आहे.

मुंबई संघाचे नेतृत्व आदित्य तारे करत असून श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि शार्दूल ठाकूर सारखी मोठी नावे देखील पहिल्या फेरीचे सामने खेळणार नाहीत. हे तीन खेळाडू इंडिया अ संघाकडून भाग घेणार आहेत.

मुंबईचा पहिल्या सामन्यासाठी रणजी संघ-
आदित्य तारे (कर्णधार) सूर्य कुमार यादव(उपकर्णधार), अभिषेक नायर, अखिल हेरवाडकर, सिद्देश लाड, जय बिस्ट, सुफियान शेख, विजय गोहिल, आकाश पारकर, रॉयस्तान डायस, मिनाद मांजेरकर, आदित्य धुमाळ, शिवम मल्होत्रा, शुभम रांजणे, एकनाथ केरकर