तिकडे भारताने मालिका जिंकली, इकडे वसीम जाफरने मनं जिंकली

विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामन्यात वसीम जाफरने रणजीमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याची कामगिरी केली आहे.

विदर्भाकडून खेळताना जाफरचा आजाच सामना कारकीर्दीतील 146वा रणजी सामना ठरला आहे. याआधी मध्यप्रदेशच्या देवेंद्र बुंदेलाच्या नावावर 145 रणजी सामने खेळण्याचा विक्रम होता.

याचबरोबर बडोदा विरुद्ध 153 धावांची खेळी करताना जाफर हा सर्वाधिक रणजी धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरला होता. त्याने ११ हजार धावांचा टप्पा पार केला होता. यामध्ये त्याच्या 39 शतके आणि 84 वेळा पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा समावेश आहे.

जाफरनंतर रणजीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये मुंबईचा अमोल मुजुमदार आहे. त्याने 9202 धावा केल्या आहेत तर बुंदेला 9201 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

फलंदाजीप्रमाणेच जाफरने क्षेत्ररक्षणातही उत्तम कामगिरी करत 191 झेल पकडले आहे.

19 वर्षे मुंबईकडून 130 रणजी सामने खेळताना जाफरने 58.48च्या सरासरीने 10585 धावा केल्या होत्या. तर 2015-16च्या हंगामापासून विदर्भाकडून त्याने 48च्या सरासरीने 1583 धावा केल्या आहेत.

दुलिप करंडकात त्याने सलग सहा अर्धशतके करण्याच्या गुंडप्पा विश्वनाथ यांच्या विक्रमाशी बरोबरी करत शतकही ठोकले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

…आणि चेतेश्वर पुजाराला नाचावे लागले, पहा व्हिडिओ

सौरव गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही किंग कोहलीने केली बरोबरी

९ पैकी ८ संघाविरुद्ध विदेशात खेळलेल्या कसोटी मालिकेत भारताने मिळवला आहे विजय…