पंजाबच्या ‘ज्यूनियर युवराज’ने द्विशतक करत केली या मोसमातील सर्वोत्तम खेळी

मोहाली। रणजी ट्रॉफी 2018 या स्पर्धेत पंजाबने पहिल्या डावात 479 धावा केल्या. यामध्ये ज्यूनियर युवराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुभमन गिलने केलेल्या द्विशतकी खेळीने पंजाबला 264 धावांची आघाडी मिळाली. तमिळनाडूने पहिल्या डावात 215 धावा आणि दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावत 250 धावा केल्या. यामुळे ते 14 धावांनी पिछाडीवर आहेत.

गिलच्या 328 चेंडूत केलेल्या 268 धावा या रणजी हंगामातील सर्वोत्तम धावा ठरल्या आहेत. यामध्ये त्याने 29 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच ही त्याची पहिलीच द्विशतकी खेळी आहे.

रविवारी (16 डिसेंबर) पंजाबच्या 308 धावांवरून पुढे खेळताना गिल 199 धावांवरून पुढे खेळाला सुरूवात केली. यावेळी त्याने युवराज सिंगसोबत 61 धावांची तर गुरकिरथ मान सोबत 83 धावांची भागीदारी केली. तसेच कर्णधार मनदिप सिंगने अर्धशतकी खेळी केली.

या सामन्यात अष्टपैलू युवराजने 41 धावा करताना तमिळनाडूच्या दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएल लिलावाच्या एक दिवसाआधीच युवराज सिंगची दमदार अष्टपैलू कामगिरी

पर्थ कसोटी: दुसऱ्या डावात भारताची अडखळत सुरुवात, विजयासाठी भारतासमोर २८७ धावांचे आव्हान

हॉकी विश्वचषक २०१८: बेल्जियम बनले नवीन चॅम्पियन, थरारक अंतिम लढतीत नेदरलॅंड्सचा केला पराभव

Video: भारतीय गोलंदाजांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्णधार कोहलीने लढवली ही नवी युक्ती