बीसीसीआयच्या ‘या’ मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात

आजपासून रणजी चषक 2018 -19 च्या मोसमाला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचीे ही 85 वी आवृत्ती असणार आहे. रणजी चषक हि बीसीसीआयची सर्वांत मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे.

यंदाच्या मोसमापासून संघांची संख्या 28 वरून 37 पर्यंत वाढवण्यात आली आहे. एलिट ए, एलिट बी, एलिट सी आणि प्लेट अशा चार गटात संघांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे हा मोसम जास्त संघ-सामने असणारा मोसम ठरणार आहे.

आजपासून पहिल्या राउंडला सुरुवात होणार असून यामध्ये 17 सामने खेळवले जाणार आहेत. बिहारचा संघ तब्बल 18 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय. गतविजेता संघ विदर्भ आज महाराष्ट्रविरुद्ध आपल्या मोसमाला पुण्यातील स्टेडियमवरून सुरुवात करेल. जेतेपद टिकवण्याच मोठे आव्हान विदर्भासमोर असणार आहे. खडूस मुंबई आज रेल्वेशी भिडणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

आज कॅप्टन कूल धोनी खेळतोय शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना !

गतविजेते मुंबई उपनगर व पुणे संघाची विजयी सलामी, जाणून घ्या पहिल्या दिवसाचे निकाल

ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय

भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा