रणजी ट्रॉफी: महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे सामना अखेर अनिर्णित

पुणे। येथील एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे सामना अखेर अनिर्णित राहिला. सामन्याच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने ६ बाद १८६ धावांवर दुसरा डाव घोषित करत रेल्वेला २८७ धावांचे लक्ष्य दिले. याचे प्रतिउत्तर देताना दिवसाखेर रेल्वेने १ बाद ५४ धावा करत सामना अनिर्णित राखला.

रेल्वेकडून दुसऱ्या डावात सौरभ वकासकर(२३*), शिवकांत शुक्ला(१२), आणि नितीन भिल्ले(१४*) यांनी सावध धावा करत सामना अनिर्णित राखला. तर महाराष्ट्राकडून चिराग खुराणाने शिवकांत शुक्लाला मुर्तझा ट्रँकवाला करवी झेलबाद केले.

तत्पूर्वी महाराष्ट्राने दुसरा डाव ६ बाद १८६ वर घोषित केला. महाराष्ट्राकडून ऋतुराज गायकवाड (१४), मुर्तझा ट्रँकवाला(२८),राहुल त्रिपाठीही (३०), अंकित बावणे(३०), नौशाद शेख(४०), रोहित मोटवानी(२०*) आणि चिराग खुराणा(१८) यांनी धावा करत महाराष्ट्राची आघाडी २८६ केली.

रेल्वेकडून करण ठाकूर(४३/३),अमित मिश्रा(४०/१),मनीष राव(/२७/१) आणि अविनाश यादव(२५/१) यांनी बळी घेतले.

आज खेळताना रेल्वेने कालच्या पहिल्या डावात ५ बाद ३३० धावांपासून सुरुवात केली. परंतु त्यांच्या तळातल्या फलंदाजांना काही विशेष करता आले नाही त्यामुळे ते ३८१ धावांवर सर्वबाद झाले. आज त्यांच्याकडून अरिंदम घोष(४५) आणि मनीष राव(३०) अनुरीत सिंग(७) करण ठाकूर(१*),अमित मिश्रा(२४), आणि अविनाश यादव(६) यांनी धावा केल्या.

महाराष्ट्राकडून निकित धुमाळ(८९/२),समद फल्लाह(७६/२), मुकेश चौधरी(७१/१), प्रदीप दधे(६४/२) आणि चिराग खुराणा(५८/२) ) यांनी बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक:
महाराष्ट्र पहिला डाव: सर्वबाद ४८१ धावा
रेल्वे पहिला डाव : सर्वबाद ३८१ धावा
महाराष्ट्र दुसरा डाव: ६ बाद १८६ धावा (घोषित)
रेल्वे दुसरा डाव: १ बाद ५४ धावा

सामनावीर: रोहित मोटवानी (१८९ आणि २०* धावा)