काल रणजी सामन्यात मैदानावर गाडी चालवणाऱ्या त्या व्यक्तीच्या पत्नीने मागितली माफी !

0 665

दिल्ली। काल दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश संघात चालू असलेल्या रणजी सामन्यात एक वॅगनआर कार मैदानात आली आणि त्यामुळे सामना थांबवावा लागला होता. त्याबद्दल आज या गिरीश शर्मा नावाच्या कार चालकाच्या बायकोने ट्विटरवरून माफी मागितली आहे.

ही कार मैदानात आल्याबद्दलचे ट्विट भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने केले होते. तो दिल्ली संघात सध्या खेळत आहे. त्याच्यासोबत काल भारताचा खेळाडू गौतम गंभीरही त्यावेळी मैदानात उपस्थित होता.

इशांतच्या ट्विटला उत्तर देताना गिरीश शर्मा या कार चालकाची बायको वार्णिका वर्मा हिने तिच्या पतीच्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. ती म्हणाली ” मी माझ्या पतीतर्फे मनापासून माफी मागते. मलाही हे बघून धक्का बसला. या बद्दल माफ करा.”

तिच्या ट्विटरवरील माहितीप्रमाणे ती तिच्या पतीपासून वेगळी राहत आहे.

या नंतरही तिने अनेक ट्विट केले आहेत. त्याचबरोबर या तिच्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

गिरीश शर्मा मल्टिनॅशनल कंपनीत कर्मचारी आहे. तो काल म्हणाला होता की गेटवर कोणतीही सुरक्षा नव्हती. याबद्दल एअर फोर्स तपास करत आहे. या कारमुळे खेळपट्टीचे कोणतेही नुकसान झाले नाही.

त्याचबरोबर त्याने आपण रस्ता विसरल्याने सांगितले होते. तसेच मैदानात येताना आपल्याला कुणीही न आडवल्याचे सांगितले होते. त्या व्यक्तीने दोन वेळा खेळपट्टीवरून गाडी चालवली. त्याला पंच आणि खेळाडूंनी थांबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु सर्व व्यर्थ गेले.

खेळ संपायला २० मिनिटे बाकी असताना हा प्रकार घडला होता. त्यावेळी पंचांनी खेळपट्टीचे निरीक्षण करून पुन्हा खेळ सुरु केला. त्यामुळे कालचा खेळ पुन्हा २०मिनिटे लांबवण्यात आला होता.

तत्पूर्वी आज दिल्ली रणजी संघाने उत्तर प्रदेश संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला.

Comments
Loading...
%d bloggers like this: