उद्यापासून शेष भारत विरूद्ध विदर्भ यांच्यात इराणी ट्राॅफीचा थरार

0 71

नागपूर | चाहत्यांना आयपीएलची ओढ लागली असताना केवळ आयपीएल लीलावासाठी पुढे ढकलेला इराणी ट्राॅफीचा थरार उद्यापासून सुरू होणार अाहे. नागपूर येथील जामठावरील विदर्भ क्रिकेट असोशियशनच्या मैदानावर हा सामना होत आहे. 

विदर्भाला पहिली वाहीली रणजी ट्राॅफी विजय मिळवून देणारा कर्णधार फैज फजलच या सामन्यात संघाचे नेतृत्व करत असून करुण नायरकडे शेष भारताचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. 

हा ५ दिवसीय सामना १४ मार्च ते १८ मार्च २०१८ दरम्यान होणार आहे. 

दुखापतग्रस्त असल्यामुळे रवींद्र जडेजाच्या जागी  रविचंद्रन अश्विनला या सामन्यात शेष भारताकडून संधी देण्यात अाली अाहे. 

हा सामना स्टार स्पोर्ट्स आणि हाॅट स्टारवर पाहता येणार आहे. 

विदर्भ टीम: फैज फजल (कर्णधार), गणेश सतीश, रवी जंगीड, रजनीश गुरबानी, वसीम जाफर, अक्षय कर्णेवार, ललीत यादव, सिद्धेश नेरळ, संजय रामस्वामी, अदित्य सरवटे, जितेश शर्मा, रवीकुमार ठाकूर, अक्षय वाखारे, अपूर्व वानखेडे, सिद्धेश वाघ, उमेश  यादव, कर्ण शर्मा, श्रीकांत वाघ, शलभ श्रीवास्तव, शुभम कापसे, अक्षय वाडकर

शेष भारत टीम : करुण नायर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यु ईश्वरम, आर. सामंथ, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, के.एस. भारत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, शाहबाज नदीम, अनमोलप्रीत सिंह, सिद्धार्थ कौल, अंकित राजपूत, नवदीप सिंह और अतित सेठ.

Comments
Loading...
%d bloggers like this: