पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत विरेन चौधरी, अनुराग पाटील, शौनक रणपिसे यांची विजयी सलामी

पुणे। पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे आयोजित व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत 10वर्षाखालील मुलांच्या गटात विरेन चौधरी, अनुराग पाटील, शौनक रणपिसे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 10वर्षाखालील मुलांच्या गटात पहिल्या फेरीत विरेन चौधरीने आशित शर्माचा 5-2 असा तर, वैष्णव रानवडेने अथर्व खडकेचा 5-1असा पराभव केला. अनुराग पाटीलने समर्थ सदावर्तेला 5-0असे नमविले. पृथ्वीराज दुधाने याने अहान सारस्वतवर 5-2अशा फरकाने विजय मिळवला. शौनक रणपिसे याने धैर्य विमलचा टायब्रेकमध्ये 5-4(5)असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचे उद्घाटन पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे संयोजक व स्थानिक नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे, पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, नगरसेवक जयंत भावे, डेक्कन जिमखाना क्लबच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शैलेश टिळक, डेक्कन जिमखान्याचे टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धा संचालक आश्विन गिरमे, क्लबच्या फायनान्स विभागाचे सचिव गिरीश इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

पहिली फेरी: 10वर्षाखालील मुले:

विरेन चौधरी वि.वि.आशित शर्मा 5-2
वैष्णव रानवडे वि.वि.अथर्व खडके 5-1
अनुराग पाटील वि.वि.समर्थ सदावर्ते 5-0
पृथ्वीराज दुधाने वि.वि.अहान सारस्वत 5-2
शौनक रणपिसे वि.वि.धैर्य विमल 5-4(5)
प्रज्ञेश शेळके वि.वि.शयन डे 5-0
अनय सोवनी वि.वि.आर्यराज कठारे 5-2
आयुष खंदाडे वि.वि.वेदांग बानी 5-2
शुभंकर सिन्हा वि.वि.त्रिशिक वाकलकर 5-2
सिद्धांत दर्डा वि.वि.तनिष पाटील 5-3