रावच्या खेळामुळे पिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता संघाला आघाडी

मुंबई । भारतीय खेळाडू मनिष रावने चांगली कामगिरी करत डीसीबी बँक पुरस्कृत एकता वर्ल्ड पिकलबॉल सुपर कप स्पर्धेत एकता परीवार संघाला पहिल्या फेरीत पिकलोहोलिक्स संघावर 13-2 असा विजय मिळवून दिला.

खार जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या दुहेरी लढतीत पिकलोहोलिक्सवर 2-1 असा विजय मिळवला. एकता परिवारने यानंटर एकही गुण न गमावता उर्वरित चार सामन्यात 2-0 असा विजय नोंदवला. दुस-या दुहेरीत रावने अनिकेत दुर्गावलीसोबत खेळताना विकी चुग व कश्यप बरानवाल जोडीला 11-6, 11-10, 11-8 असे नमविले.

दिवसाच्या चुरशीच्या लढतीत सुपर स्मॅशर्स संघाने डिंक किलर्सला 9-6 असे नमविले. मिश्र दुहेरी गटात कुलदीप महाजन व वृषाली ठाकरे यांनी शेवटच्या सामन्यात चमक दाखवली. त्यांनी विशाल चुग व रोशनी खंबायत जोडीला 3-0 असे नमवित सुपर स्मॅशर्ससाठी निर्णायक कामगिरी बजावली. या सामन्यापुर्वी चार सामन्यांनंतर टाय 6-6 असा बरोबरीत होता. मिक्स पिकल्स संघाने फँटम स्टार्सला 10-5 असे नमविले.

-गुणतालिका (पहिल्या फेरीनंतर)
1) एकता परीवार 13 गुण 2) मिक्स्ड पिकल्स 10 गुण 3) सुपर स्मॅशर्स 9 गुण
4) डिंक किलर्स 6 गुण 5) फँटम स्टार्स 5 गुण 6) पिकलोहोलिक्स 2 गुण

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया...

संपुर्ण वेळापत्रक- असा आहे विराट कोहलीच्या टीम इंडियाचा आॅस्ट्रेलिया दौरा

तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना

आणि १३ वर्षांचा सचिन झाला चक्क पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक

दिल्ली डेअरडेविल्सकडून तीन मोठ्या खेळाडूंना संघातून डच्चू