केएल राहुलच्या बाबतीत झाला नकोसा असा योगायोग

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात मंगळवारी पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताला 118 धावांनी पराभूत करत पाच सामन्यांची मालिकाही 4-1 अशी जिंकली.

असे असले तरी या सामन्यात भारताकडून केएल राहुल आणि रिषभ पंतने शतक करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण त्याचवेळी राहुलला 149 धावांवर खेळत असताना इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदने त्रिफळाचीत केले.

यामुळे मात्र राहुलच्या बाबतीत एक नकोसा असा योगायोग झाला आहे. याआधीही 2016 मध्ये चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात राहुलला रशीदनेच 199 धावांवर बाद केले होते. यावेळीही त्याला 200 धावा करण्यासाठी फक्त एका धावेची गरज होती.

तसेच मंगळवारी पार पडलेल्या सामन्यातही राहुलला दिडशे धावा करण्यासाठी फक्त एका धावेची गरज असताना रशीदने बाद केले आहे.

रशीदने राहुलला बाद केलेला चेंडूची तुलना आॅस्ट्रेलियाचा महान गोलंदाज शेन वॉर्नने 1993 ला अॅशेस मालिकेत टाकलेल्या ‘बॉल आॅफ सेंचुरीशी’ही केली गेली. हा चेंडू वॉर्नने माईक गेटींग फलंदाजी असताना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर टाकला होता. त्यावेळी हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच होत आॅफ स्टंपवर आला होता.

याचप्रमाणे रशीदनेही राहुलला बाद केलेला चेंडूही टाकला होता आणि राहुलला त्रिफळाचीत केले होते.

याबरोबरच रशीदने नुकत्याच पार पडलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही बर्मिंगहॅम कसोटीत 149 धावांवर आणि नॉटींघम कसोटीत 97 धावांवर असताना बाद केले आहे.

राहुलचे हे कसोटीतील पाचवे शतक होते. तसेच त्याने ही पाचही शतके वेगवेगळ्या देशात करण्याचा पराक्रम केला आहे. असे करणारा तो अजिंक्य रहाणेनंतरचा दुसराच फलंदाज ठरला आहे.

राहुलबरोबरच या सामन्यात रिषभ पंतने 114 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

रोहित शर्माला मिळाल्या युजवेंद्र चहलकडून बॅटींगच्या टिप्स

पराभवानंतरही टीम इंडिया अव्वल स्थानी कायम

हॉकीपटू सरदार सिंगने घेतली आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती