भाऊ तुमच आॅरेंज आर्मीत स्वागत, राशिदने केलं या खेळाडूचं खास स्वागत

आज(18 डिसेंबर) आयपीएलच्या 12 व्या मोसमाचा लिलाव जयपूरमध्ये सुरु आहे. या लिलावात अनेक युवा खेळाडूंवर बोली लावण्यात प्रत्येक संघाने पसंती दाखवली आहे. यामध्ये इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोवर सनरायझर्स हैद्राबाद संघाने बोली लावली आहे.

त्याला हैद्राबादने 2 कोटी 20 लाखाची बोली लावत संघात सामील करुन घेतले आहे. त्याची मुळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. त्याला संघात घेतल्यानंतर हैद्राबादने त्याच्या स्वागताचे ट्विट केले आहे.

या ट्विटवर कमेंट करताना हैद्राबादचा स्टार गोलंदाज राशीद खाननेही बेअरस्टोचे आॅरेंज आर्मी म्हणजेच हैद्राबाद संघात स्वागत केले आहे. त्याने ट्विटवर कमेंट करताना म्हटले आहे की ‘बेअरस्टो तूझे आॅरेंज आर्मीमध्ये स्वागत आहे.’

यावर बेअरस्टोने देखील उत्तर देत त्याला धन्यवाद म्हटले आहे. यावर पून्हा राशीद खानने त्याला ‘लवकरच भेटू’ असे उत्तर दिले आहे.

राशीद खान बरोबरच मोहम्मद नबीनेही बेअरस्टोचे हैद्राबाद संघात स्वागत केले आहे.

बेअरस्टो हैद्राबाद संघासाठी डेव्हिड वॉर्नरसह सलामीला फलंदाजी करु शकतो. बेअरस्टो आत्तापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेला नाही. त्यामुळे त्याचा हा आयपीएलमधील पहिलाच मोसम असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

चेन्नई एवढा तगडा संघ परंतु आतापर्यंत केलाय एकच खेळाडू केलाय खरेदी

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आतापर्यंत हे ३ मोठे खेळाडू

आयपीएल २०१९ लिलाव: युवराजसह या ५ महान खेळाडूंना नाही कुणीही वाली