आता राशिद खान सांभाळणार अफगाणिस्तान संघाचे कर्णधारपद!

आफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आज(12 जूलै) क्रिकेटच्या सर्व प्रकारासाठी युवा फिरकी गोलंदाज राशिद खानकडे अफगाणिस्तान संघाच्या कर्णधार पदाची धूरा सोपवली आहे.

तसेच विश्वचषकाआधी कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलेल्या असगर अफगाणकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

विश्वचषकाआधी अफगाणिस्तान बोर्डाने त्यांच्या संघाच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल केले होते. त्यांनी अफगाणला कर्णधार पदावरुन काढून टाकत तीन क्रिकेट प्रकारासाठी तीन वेगवेगळे कर्णधार नेमले होते. यामध्ये वनडेसाठी गुलबदीन नाईब, टी20 साठी राशिद खान आणि कसोटीसाठी रेहमत शहाला कर्णधार केले होते.

पण आता पुन्हा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या संघाच्या नेतृत्वामध्ये बदल केला आहे आणि राशिदकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.

अफगाणिस्तानने गुलबदीनच्या नेतृत्वाखाली 2019 विश्वचषकात खराब कामगिरी केली होती. त्यांना या विश्वचषकात एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे ते गुणतालिकेतही तळाला राहिले.

तसेच गुलबदीनची कामगिरीही खास झाली नाही. त्याने गोलंदाजीत 6.39 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आणि 9 विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजीत 21.55 च्या सरासरीने 194 धावा केल्या आहेत.

गुलबदीनच्या आधी कर्णधार असलेल्या अफगाणच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाने वनडेमध्ये 56 सामन्यात 31 विजय मिळवले आहेत. तसेच टी20 मध्ये 46 सामन्यांपैकी 37 विजय मिळवले आहेत. त्याचबरोबर असगरच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने पहिला कसोटी विजयही मिळवला आहे.

तसेच नुकतेच अफगाणिस्तान संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या राशीदने याआधी अफगाणिस्तानचे 4 वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे. यामध्ये त्यांना 1 विजय आणि 3 पराभव स्विकारावे लागले आहेत.

राशीद आता सप्टेंबरमध्ये बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात, तसेच बांगलादेश आणि झिम्बाब्वे विरुद्ध होणाऱ्या त्रिरंगी मालिकेत अफगाणिस्तानचे नेतृत्व करेल. तसेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विंडीज विरुद्ध तीन टी20, तीन वनडे आणि एक कसोटी मालिकेतही तो अफगाणिस्तानचे कर्णधारपद सांभाळेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकासाठी संघातील समावेश प्रकरणाबाबत डिविलियर्सने सोडले मौन, केला मोठा खूलासा

विश्वचषक २०१९: १६ वर्षांपूर्वीचा पाँटिंगचा विक्रम मोडत जो रुटने रचला इतिहास

तब्बल ३२७ महिन्यांनतर इंग्लंडच्या संघाने केला असा मोठा पराक्रम