१५ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडत राशिद खानने कसोटी क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास

2019 विश्वचषकानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने फिरकीपटू राशिद खानकडे सर्वप्रकारच्या क्रिकेटसाठी कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे आजपासून(5 सप्टेंबर) बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुरु झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात राशिद अफगाणिस्तानचे नेतृत्व करत आहे.

याबरोबरच कसोटीत पहिल्यांदाच नेतृत्व करत असलेल्या राशिदने एक खास विश्वविक्रमही केला आहे. तो कसोटीत नेतृत्व करणारा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. त्याचे वय आज 20 वर्षे 350 दिवस आहे.

याआधी हा विक्रम झिम्बाब्वेच्या तातेंदा तायबूच्या नावावर होता. त्याने 20 वर्षे 358 दिवस एवढे वय असताना मे 2004 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा कसोटी सामन्यात नेतृत्व केले होते. त्यानंतर आता 15 वर्षांनंतर हा विक्रम राशिदने मोडला आहे.

कसोटीत नेतृत्व करणाऱ्या सर्वात युवा कर्णधारांमध्ये राशिद आणि तायबूच्या पाठोपाठ भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी(नवाब पतौडी) आहेत. त्यांनी मार्च 1962मध्ये विंडीज विरुद्ध पहिल्यांदा कसोटीमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. त्यावेळी त्यांचे वय 21 वर्षे 71 दिवस होते.

आजपासून सुरु झालेल्या बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघातील कसोटीत राशिदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कसोटीमध्ये नतृत्व करणारे सर्वात तरुण कर्णधार – 

20 वर्षे 350 दिवस – राशिद खान

20 वर्षे 358 दिवस – तातेंदा तायबू

21 वर्षे 71 दिवस – मन्सूर अली खान पतौडी(नवाब पतौडी)

22 वर्षे 15 दिवस – वकार यूनूस

22 वर्षे 82 दिवस – ग्रॅमी स्मिथ

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

डेव्हिड वॉर्नरला शून्यावर बाद करत ब्रॉडने मोडला अँडरसन, अश्विनचा हा मोठा विक्रम

विराट कोहली, पृथ्वी शॉपेक्षा माझा प्रवास खूप वेगळा आहे…

हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, टीम इंडियामधील ‘हा’ खेळाडू सर्वात महत्त्वाचा