वडीलांच्या निधनानंतरही तो खेळाडू खेळत होता संघासाठी…

अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खानच्या वडीलांचे रविवारी (30 डिसेंबर) निधन झाले. पण त्यानंतरही रशीद त्याच्या वडीलांच्या सन्मानार्थ नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला अॅडलेड स्ट्रायकर्स संघाकडून सिडनी थंडर विरुद्ध बीबीएलमध्ये खेळत होता.

रशीदने या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या. तसेच अॅडलेड संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात अॅडलेड संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 175 धावा केल्या होत्या. या आव्हानाचे रक्षण करताना अॅडलेड संघाकडून रशीद बरोबरच पिटर सिडल 3 तर मायकल नेसानने 1 विकेट घेतली.

त्यामुळे सिडनी संघाला 20 षटकात 6 बाद 155 धावाच करता आल्या. हा सामना अॅडलेड संघाने 20 धावांनी जिंकला.

या सामन्याआधी रशीद खानने ट्विट केले होते की ‘आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला गमावले आहे. मला आत्ता समजले की तूम्ही मला नेहमी मजबूत रहायला का सांगत होते. कारण तूम्हाला माहित होते की मला आज तूम्हाला गमावण्याचे दु:ख सहन करण्यासाठी शक्तीची गरज आहे.’

रशीद सध्या आयसीसीच्या टी20 गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 35 सामन्यात 12.89 च्या सरासरीने 116 विकेट्स घेतल्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या २०१८ वनडे संघाचा विराट कोहली झाला कर्णधार

नववर्षातील असाही एक योगायोग जो आहे केवळ सचिन कोहलीच्या नावावर

२०१८मध्ये वनडेत धावांचा रतिब घालणारे ५ फलंदाज