आणि रशीद लतिफने विजयानंतर दिली प्रतिक्रिया

अंतिम सामन्यापूर्वी वीरेंद्र सेहवाग, रशीद लतीफ आणि मनोज तिवारी यांच्यातील वाद जोरदार गाजला. त्यात रशीद लतिफने असभ्य भाषेत भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागवर टिप्पणी केली. त्याला मनोज तिवारीने व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले.

यामुळे अंतिम सामना झाल्यावर कोण काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचे डोळे लागले होते. परंतु अशी कोणतीही प्रतिक्रिया लतीफने न देता संयमी आणि भारत पाकिस्तान क्रिकेटचं भलं होणारी प्रतिक्रिया दिली.

यात आधी लतीफने पाकिस्तानच्या खेळाडूंना आणि आणि संघाला शाबासकी दिली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान संघाने एकत्र खेळलं पाहिजे असं भाष्य केलं.

रशीद लतीफ आपल्या या व्हिडिओमध्ये म्हणतो, ” भारत पाकिस्तानचं क्रिकेटचं खर मार्केट आहे. आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू खेळत नाही तर पीएसएलमध्ये भारतीय खेळाडू खेळत नाही. हे आयसीसीला पण माहित आहे त्यामुळे भारत पाकिस्तान सामने आयसीसी होऊ देत नसावं. आपल्याकडे भारत पाकिस्तान श्रीलंका अफगाणिस्तान आणि बांगलादेश सारख्या टीम आहेत. परंतु आपल्याकडे सामने होत नाही.

“कोण कुणाचा बाप नाही आणि कोण कुणाचा मुलगा नाही. सगळे क्रिकेटप्रेमी आहेत. तुम्ही ही पद्धत सुरु केली आता आम्ही ती संपवतो. हे क्रिकेट आहे. यात हार- जीत होत असते. भारताकडे दिग्गज खेळाडू आहेत. पहिल्यांदाच सोशल मेडियावर एक जंग लढली गेली. परंतु असं व्हायला नको होत. आपण सामने खेळले पाहिजे. जेवढं जास्त आपण खेळू तेवढा आपल्याला फायदे होईल. दोनही संघाला पैसे मिळतील. यामुळे मोहब्बत का पैगाम आहे पाकिस्तानकडून. भारताकडून, सेहवागकडून पण तीच अपेक्षा आहे. ऋषीजींचा चित्रपट पाहून आम्ही मोठे झालो. आता आपण जोडायची गोष्ट करो आणि तोडायची नको. ”