राशीफ लतीफवर मनोज तिवारीचा हल्लाबोल, व्हिडिओच्या माध्यमातून दिले उत्तर!

भारताच्या श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी यष्टीरक्षक राशिद लतीफने वीरेंद्र सेहवागवर जोरदार टीका केली. तसेच या व्हिडिओ मध्ये घाणेरड्या शब्दांचा वापर केला आहे. यावर वीरेंद्र सेहवागने काहीही उत्तर न देता फक्त अर्थपूर्ण शांतता ही निरर्थक बडबडीपेक्षा कधीही बरी असा ट्विट केला आहे. परंतु भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून राशिद लतीफवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

हिंदी भाषेत असणाऱ्या ह्या ट्विटमध्ये तिवारी म्हणतो, ” मी हा व्हिडिओ मजबुरीनेच रेकॉर्ड केला आहे. मी तसे व्हिडिओ खूप कमी प्रसिद्ध करतो. परंतु हा करण्याची मला गरज वाटली. कारण ‘राशिद लतीफ’, जे क्रिकेट पाहतात त्यांना हे नाव माहित असेल. त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यात भारताच्या महान वीरेंद्र सेहवागला वाईट शब्द वापरले आहेत. तसेच सेहवागला शिव्याही दिल्या आहेत.”

“मग मी विचार केला ह्या व्यक्तीला काय झालं आहे. याने अचानक व्हिडिओ का उपलोड केला. त्यात आपल्याच महान खेळाडूलाच का टार्गेट करत आहे. बराच वेळ विचार केल्यावर समजलं की ह्या व्यक्तीला प्रसिद्धी हवी आहे. यांना फेम पाहिजे. जी प्रसिद्धी आजकाल यांना मिळत नाही. माहित नाही देव यांना ती कधीपासून देत नाही. यांना कुणी टीव्हीवर बोलवत नाही.”

“एकंदरीत व्हिडिओमधील शब्द पाहून वाटते की यांना कुणी मुलाखतीसाठीसुद्धा बोलावत नसेल. एक्स्पर्ट कंमेंट्ससाठी कुणी बोलावत नसेल. यांना कसं बोलावं कळतच नाही. कोणत्या खेळाडूबद्दल यांना आदर नाही. राशिदजी आपण आपले रेकॉर्ड चेक करा. खरं तर ते रेकॉर्ड इंग्लिशमध्ये आहे. आपल्याला इंग्लिशची समज नाही आहे. ”

या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम

#1 भारत पाकिस्तान सामना झाल्यावर वीरेंद्र सेहवागने केलेला ट्विट

#2 भारत श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाल्यावर राशिद लतीफ यांनी केलेला ट्विट

#3 त्या ट्विटला सेहवागने अप्रत्यक्ष दिलेले उत्तर

#4 मनोज तिवारीने काल ट्विटरच्या माध्यमातून राशिद लतीफवर केलेला हल्लाबोल