रवी शास्त्री भारतीय संघाचा प्रशिक्षकपदी !

मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाली आहे. ही निवड २०१९ रोजी होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकापर्यंत असेल.

काल भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सल्ल्लागार समितीने पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यात रवी शास्त्रींचे नाव हे सर्वात आघाडीवर होते आणि अपेक्षाप्रमाणे रवी शास्त्रींची प्रशिक्षकपदी निवड झाली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागितले. काल त्यातील पाच उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. काल मुलाखती नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचा माजी कर्णधार आणि सल्लगार समितीचा सदस्य असलेल्या सौरभ गांगुलीने सांगितले की , प्रशिक्षक पदाची घोषणा करण्याआधी समिती कोहलीशी बोलू इच्छिते आणि म्हणूनच आज प्रशिक्षकाची घोषणा होणार नव्हती.

परंतु सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने ही निवड आजच करायला सांगितल्यामुळे आज या मुंबईकर खेळाडूची या पदावर निवड झाली.