या खेळाडूमुळे हार्दिकने केली नवी हेअरस्टाईल

चेन्नई । भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय खेळाडू प्रत्येक मालिकेपूर्वी करत असलेल्या हेअरस्टाईलला तसेच टॅटू काढण्याला पाठिंबा दिला आहे. भारतीय क्रिकेट संघातील काही तरुण खेळाडू नवनवीन हेअरस्टाईलसाठी आजकाल ओळखले जातात.

इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री म्हणतात, ” भारतीय संघातील खेळाडू मॉडेल्स पेक्षा काही कमी नाहीत. त्यामुळे जर अशा लोकांमध्ये मला राहायचं असेल तर मला फिट राहावं लागेल. ”

याबद्दल पुढे बोलताना शास्त्री गमतीने म्हणाले, ” मी त्यांच्या हेअरस्टाईलची बरोबर नाही करू शकत. आणि जर मी तस केलं तर माझे सर्व केस गळून जातील. ”

रवी शास्त्री हे जरी खेळाडूंना पाठिंबा देणाऱ्या प्रशिक्षकांपैकी एक असले तरी आपण कडक शिस्तीचेही आहोत हे सांगायला ते विसरत नाही. ते म्हणतात, ” खेळाडूंनी मैदानाबाहेर त्यांना हवे तसे वागावे. परंतु संघात किंवा सामन्यात त्यांनी कोणतीही शिस्त मोडलेली मला आवडत नाही. ”

हार्दिक पंड्याची हेअरस्टाईल असे असण्याचं कारण शिखर धवन असल्याचं ते पुढे म्हणतात. ” हार्दिक पंड्याची सध्याची हेअरस्टाईल ही शिखर धवनने त्याला देणगी आहे. त्याने हार्दिकचे केस कापले. या संघात अशी वेगवेगळी प्रतिभा असणारे अनेक खेळाडू आहेत. ”

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिला सामना उद्या होणार आहे.