निमरत कौरबरोबरचे अफेअर ही अफवा – रवी शास्त्री

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि बॉलीवूड अभिनेत्री निमरत कौर यांच्यामध्ये अफेअर असल्याची सध्या चर्चा आहे. परंतू आता या दोघांनीही ही अफवा असल्याचे म्हटले आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार शास्त्री आणि निमरत यांच्यात अफेअर सुरु आहे. पण आता शास्त्रीनी इंग्लंडमधील एशियन एजला दिलेल्या मुलाखतीत या अफेअरच्या वृत्ताला फेटाळून लावले आहे.

जेव्हा त्यांना पत्रकारांनी या विषयी पुन्हा विचारले तेव्हा ते म्हणाले, यात कोणतेही तथ्य नाही. आणि त्यात काही बोलण्यासारखे नाही.

शास्त्री हे काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीपासून वेगळे झाले आहेत.

याबरोबरच अभिनेत्री निमरत यांनीही ट्विट करत शास्त्रीबरोबरील अफेअरचे वृत्त काल्पनिक असल्याचे म्हटले आहे.

शास्त्री आणि निमरत हे 2015ला एका लक्झरी ऑटोमोबाईल ब्रँडच्या गाड्यांच्या प्रमोशनानिमित्त भेटले होते .

तसेच शास्त्री सध्या भारतीय संघाबरोबर इंग्लंड दौऱ्यावर असून निमरत या एका वेब-शूटनिमित्त व्यस्त आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

विंडिजच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक घोषित; पुणे-मुंबईत होणार वनडे सामने

टॉप 5: अॅलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास विक्रम

फिफा २०१८च्या ‘मेन्स बेस्ट प्लेयर’ अवॉर्डमध्ये मेस्सीचे नाव नाही!