रवी शास्त्रींना प्रशिक्षक पदावरुन हटवण्याची या माजी भारतीय क्रिकेटपटूने केली मागणी

भारतीय संघाने नुकताच इंग्लंड दौरा केला आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी आणि वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संघातील खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना टीकेला सामोरे जावे लागत आहे.

यामध्ये आता भारताचे माजी सलामीवीर फलंदाज आणि सध्याचे उत्तर प्रदेशचे क्रिडामंत्री चेतन चौहानचीही भर पडली आहे.

ते म्हणाले, “रवी शास्त्रींना आॅस्ट्रलियाच्या दौऱ्याआधी मुख्य प्रशिक्षक पदावरुन हटवले पाहिजे. रवी शास्त्री हे चांगले समालोचक आहेत. त्यांना ते करण्याची परवानगी द्यायला हवी.”

भारतीय संघाला मायदेशात मिळालेल्या यशानंतर मात्र परदेशात खेळताना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये यावर्षी अपयश आले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत यश मिळवले होते, पण त्यांना कसोटी मालिकेत १-२ अशा फरकाने पराभव स्वीकरावा लागला होता.

तसेच नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात भारताला कसोटी आणि वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

याबरोबरच शास्त्रींनी सध्याचा भारतीय संघ हा गेल्या १५ वर्षांतील परदेशात सर्वात यशस्वी संघ असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या मतावर अनेकांनी टीका केली होती.

याबद्दल चौहान म्हणाले , “मला असे वाटत नाही. १९८०मधील भारतीय संघ हा परदेशात चांगली कामगिरी करणारा जगातील सर्वोत्तम संघ होता.”

भारतीय संघाने मागील काही वर्षात बांगलादेश, श्रीलंका आणि विंडीज या तुलनेने कमजोर संघाविरुद्ध परदेशात कसोटी विजय मिळवले होते. मात्र भारताला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड अशा तुल्यबळ संघांविरुद्ध परदेशात विजय मिळवण्यात अपयश येत आहे.

भारताने बांगलादेश, श्रीलंका आणि विंडीज व्यतिरिक्त शेवटचा परदेशातील कसोटी मालिका विजय २००९ ला न्यूझीलंड विरूद्ध मिळवला होता.

त्यानंतर भारताने परदेशात कसोटी मालिकेत खेळताना इंग्लंडिरुद्ध २०११ मध्ये ४-०, २०१४मध्ये १-३ आणि २०१८ मध्ये १-४, तर ऑस्ट्रेलिया विरूद्ध २०११-१२ मध्ये ०-४, २०१४-१५ मध्ये ०-२ असा पराभव स्वीकारला होता.

तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१०-११ मध्ये १-१ अशी कसोटी मालिका बरोबरीच राहिली होती. तर २०१४ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ०-१ असा पराभव स्विकारावा लागला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्समधील सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा आणि जीन्सन जॉन्सन यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

रिषभ पंतच्या प्रशिक्षकाची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस

दिल्ली क्रिकेटच्या हितासाठी राजीनामा देत आहे – विरेंद्र सेहवाग