शास्त्रींच्या मते भारत नाही तर हा संघ आहे विश्वचषक विजेतपदासाठी प्रबळ दावेदार…

2019 विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता जेमतेम दिड महिन्याचा कालावधी राहिलेल्या या विश्वचषकाबद्दल चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अनेकांनी या विश्वचषक विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार कोण असतील याबद्दल अंदाज बांधले आहेत.

यामध्ये भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंड हा संघही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.

दुबईमधील एका कार्यक्रमात बोलताना शास्त्री म्हणाले, ‘इंग्लंड मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत. तसेच त्यांच्याकडे फलंदाजांची आणि गोलंदाजीची खोली आहे आणि ते त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहेत. त्यामुळे ते प्रबळ दावेदार असतील.’

‘पण असे अनेक संघ आहेत जे कोणत्याही संघाला एखाद्या दिवशी पराभूत करु शकतात. विश्वचषकासारख्या स्पर्धेत तूम्हाला प्रत्येक सामन्यात अव्वल रहावे लागते.’

या बरोबरच 2019 च्या या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या 15 जणांच्या भारतीय संघात संधी न मिळालेल्या खेळाडूंसाठी शास्त्री म्हणाले ‘ज्या खेळाडूंना संधी मिळाली नाही त्यांनी त्यांचे मन छोटे करु नये. हा मजेदार खेळ आहे. यात खेळाडू दुखापतग्रस्त देखील होऊ शकतात. त्यामुळे तूम्हाला माहीत नाही की कधी कोणाला संधी मिळेल.’

2019 च्या या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात अंबाती रायडू आणि रिषभ पंतला वगळण्यात आले आहे. त्यांच्या ऐवजी विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांना संधी मिळाली आहे.

त्याचबरोबर आत्तापर्यंत 2019 विश्वचषकासाठी आठ संघानी 15 जणांचे संघ जाहीर केले आहे. यात भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

हा खेळाडू विश्वचषकासाठी संघात असल्याने कर्णधार कोहली आहे खूश

रैना, कोहलीनंतर हिटमॅन रोहित शर्मानेही केला तो खास विक्रम

आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा अमित मिश्रा पहिलाच भारतीय