भारतीय प्रशिक्षक पदासाठी ‘रवी शास्त्री’ च फेव्हरेट

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी ‘रवी  शास्त्री’ ची निवड ही जवळपास निश्चित झाली असल्याची बातमी आहे. कुंबळेच्या प्रशिक्षक पदावरून पायउतार झाल्यामुळे बीसीसीआयने नव्याने प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत.

‘रवी  शास्त्री’ ला गेल्या वर्षी प्रशिक्षक (मॅनेजर ) पदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानेही कुंबळेप्रमाणेच तब्बल १ वर्ष प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी केली होती.

इंडियन एक्सप्रेसबरोबर बोलताना ‘रवी  शास्त्री’ ने या वृत्ताला दुजोरा दिला आहे की त्याने प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याचं ठरवलं आहे.

आपण जर प्रशिक्षक पदासाठी आपलं नाव निश्चित होणार असेल तरच अर्ज करू ह्या बातमीच मात्र रवी  शास्त्रीने खंडन केलं आहे. या सर्व अफवा असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

पहिल्यांदाच ५५वर्षीय रवी शास्त्रीने आपण ह्या पदासाठी अर्ज करत असल्याचं सांगितलं आहे. रवी शास्त्री आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्यातील चांगल्या कॉम्बिनेशनच्या गोष्टी कायमच चर्चिल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षी जेव्हा रवी शास्त्रीच्या जागी कुंबळेची नियुक्ती झाली तेव्हा विराट नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या.