एमएस धोनीनंतर हर्ष गोएंकानी साधला रवि शास्त्रींवर निशाना

गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंच्या फिटनेस वर जास्त भर दिला आहे. वादग्रस्त यो-यो टेस्टचा अवलंब त्याचाच एक भाग आहे. या यो-यो टेस्टला भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा पूर्णपणे पाठींबा आहे.

भारतीय क्रिकेटपटूंच्या फिटनेसबाबत जागरुक असणारे शास्त्री आता मात्र त्यांच्या फिटनेसवरुन ट्रोल झाले आहेत.

एमएस धोनीवर सातत्याने टीकेची झोड उठवणाऱ्या हर्ष गोएंकाच्या तावडीत आता रवि शास्त्री सापडले आहे.

गोएंकानी बुधवारी (८ ऑगस्ट)  ट्विटरवर रवि शास्त्रींचा एक फोटो पोस्ट केला होता.

“भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीसाठी भारताकडून चांगली कामगिरी करण्यासाठी रवि शास्त्री सज्ज आहेत.” रवि शास्त्रींच्या फिटनेसवर खोचक टीका करताना हर्ष गोएकां असे म्हणाले.

यापूर्वीही अनेकवेळा सोशल मिडियावर रवि शास्त्रींचा फिटनेस चर्चेचा विषय ठरला आहे. शास्त्रींना त्याच्या फिटनेसमुळे नेटकऱ्यांनी अनेकदा धारेवर धरले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अनुष्का शर्मा टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्यामागे हे आहे खरे कारण

सौरव गांगुली म्हणतो, हे केल्यास आर अश्विनची ताकद आणखी वाढणार

-आयसीसीने घेतला महत्त्वाचा निर्णय, टी-२० क्रिकेट येणार धोक्यात!