रवी शास्त्रींना हवा सचिन फलंदाजी सल्लागार !

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रीनां भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हवा आहे. बुधवारी शास्त्री यांनी बीसीसीआयने आयोजित केलेल्या विशेष समितीच्या बैठकीमध्ये अशी इच्छा व्यक्त केली. या समितीचे अध्यक्ष सी.के. खन्ना होते, तर मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी, कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी आणि प्रशासकीय मंडळाचे सदस्य डायना एडलजी यांचा समावेश होता.

शास्त्रींना ज्या सल्लागार समितीने निवडले त्या समितीत सचिनही होता.

या विशेष समितीने हे स्पष्ट केले की कोणतीही भूमिका पूर्णवेळ असो किंवा सल्लागार म्हणून असो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होत नाही हे पाहणे गरजेचे आहे.

“रवीने सचिनला थोड्या काळासाठी सल्लागार म्हणून नियुक्त करण्याची कल्पना पुढे मांडली परंतु समितीने लगेच त्यांना कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टबद्दल आठवण करून दिली,” असे समितीचे एक सदस्यांनी पीटीआय सांगितले.

जर तेंडुलकर ही भूमिका स्वीकारत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला आयपीएलसह इतर विविध जबाबदार्या सोडून द्यावे लागतील. “आणि अतिशय कमी कालावधीसाठी मिळणाऱ्या या भूमिकेसाठी तो इतर व्यावसायिक प्रतिबद्धता सोडणार नाही अशी अपेक्षा आहे.”

झहीर वर्षभरात सुमारे २५ दिवस संघासोबत राहील आणि बाकी काळात आयपीएल व इतर कामात तो व्यस्थ राहील अशी त्याची इच्छा आहे. पण जर त्याला हे सल्लागारांचे पद घायचे असेल तर त्याला बाकी सगळे सोडावे लागेल आणि तो असे करणार नाही असे दिसून येते.

शास्त्रींचा सहाय्यक स्टाफ मंगळवारी घोषित करण्यात आला होता, तर झहीर व द्रविड यांच्या सल्लागाराच्या भूमिकेची अद्यापही स्पष्टता दिसत नाही.

गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करणारे अरुण हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टमुळे आयपीएल फ्रॅंचाइझी आरसीबी आणि टीएनपीएलचे व्हीबी थिरुवल्लूर वीरन यांचा भाग राहणार नाहीत.

सहाय्यक स्टाफचे अन्य सदस्य सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर आहेत यांना २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत कायम ठेवले आहे.