आर अश्विनचा दुहेरी करिष्मा, २०० विकेट आणि २००० धावा करणारा चौथा भारतीय

कोलंबो: येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत भारताचा अष्टपैलू खेळाडू अश्विनने खास विक्रम केला आहे. कसोटीमध्ये २०० विकेट्स आणि २००० धावा करणारा तो केवळ चौथा भारतीय अष्टपैलू खेळाडू बनला आहे.

यापूर्वी भारताकडून अनिल कुंबळे (२५०६ धावा आणि ६१९ विकेट्स), हरभजन सिंग (२२२४ धावा आणि ४१७ विकेट्स) आणि कपिल देव (५२६४ धावा आणि ४३४ विकेट्स) यांनी ही कामगिरी केली आहे.

अश्विनने आज ९२ चेंडूत ५४ धावा केल्या. ही अश्विनची ५१वी कसोटी आहे. २००० धावा आणि २०० विकेट्स घेण्यासाठी सर्वात कमी कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन आता चौथ्या स्थानावर आहे.

वेगवान २०० विकेट्स आणि २००० धावा करणारे खेळाडू
४२ कसोटी, इयान बोथम
५० कसोटी, कपिल देव
५०कसोटी, इम्रान खान
५१ कसोटी, आर अश्विन