असं कराल तर याद राखा! अश्विनने नेटिझन्सला सुनावले

चेन्नई । भारताचा स्टार अष्टपैलु आर. अश्विन हा त्याच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो. त्याचे प्रत्येक गोष्टींवर स्वतःचे असे विचार आहे. त्यामुळे भूमिका घेताना हा खेळाडू कधीही मागे-पुढे पाहत नाही.

हा खेळाडू अनेक वेळा समाजात चांगला संदेश जावा म्हणून ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. कालही ह्या खेळाडूने समाजातील वर्णभेद, जात आणि धर्म यावर नेटिझन्सला चांगलेच सुनावले.

“सार्वजनिक जीवनात सक्रिय असणाऱ्या व्यक्तींना सोशल माध्यमांवर कायम टार्गेट केले जाते. काही लोक मलाही सतत असे टार्गेट करत माझ्याबद्दल द्वेष पसरवला जातो. परंतु असे असले तरीही मी जात आणि धर्म यांच्यावर आधारित द्वेष खपवून घेणार नाही, मी त्याविरुद्ध भूमिका घेईल. ” असे अश्विनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अश्विन सध्या भारतीय संघातून बाहेर असून त्याला कसोटी सामन्यांत संधी दिली जाते. त्यामुळे तो विजय हजारे चषकात सध्या तामिळनाडूकडून भाग घेत आहे.