आर अश्विनने केला मोठा पराक्रम; अनिल कुंबळेलाही टाकले मागे

हैद्राबाद। भारत विरुद्ध विंडिज संघात आजपासून (12 आॅक्टोबर) दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने खास विक्रम केला आहे.

त्याने या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा त्याने प्रथम श्रेणीच्या 107 व्या सामन्यात केला आहे.

त्यामुळे तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सामन्यांच्या तुलनेत सर्वात जलद 500 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आला आहे. या यादीत अव्वल स्थानावर भारताचे माजी गोलंदाज अमर सिंग आहेत. त्यांनी 90 सामन्यात 500 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच या यादीत भारताचा माजी दिग्गज गोलंदाज आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे हा सहाव्या स्थानावर आहे. त्याने 112 व्या प्रथम श्रेणी सामन्यात 500 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला होता.

अश्विनने या सामन्यात पहिल्या दिवशी कायरन पॉवेलची विकेट घेतली आहे. ही त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 500 वी विकेट होती. त्याने पॉवेलला पहिल्या डावात 12 व्या षटकात बाद केले आहे.

या सामन्यात विंडीजने पहिल्या दिवसाखेर 95 षटकात 7 बाद 295 धावा केल्या आहेत. रोस्टन चेस हा 98 धावांवर नाबाद खेळत आहे. भारताकडून अश्विन व्यतिरिक्त उमेश यादव आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 500 विकेट घेणारे गोलंदाज (सामने)-

90 – अमर सिंग

103 – पद्माकर शिविलकर

106 – वामन कुमार

107 – आर अश्विन

110 – सुभाष गुप्ते/ भागवत चंद्रशेखर

112 – अनिल कुंबळे/ इरापल्ली प्रसन्ना

महत्वाच्या बातम्या-

फलंदाजांसाठी गोलंदाज अनिल कुंबळेने केली जगातील सर्वात भारी गोष्ट

कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयकडून मोठा धक्का

एकवेळ धोनीशी पंगा घेणारा खेळाडूच झालायं धोनीचा समर्थक