श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन म्हणतो अश्विन ‘स्मार्ट क्रिकेटर ‘

श्रीलंकेचा माजी जगप्रसिद्ध फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने अश्विनची कौतुक करताना म्हणतो हा ऑफ -स्पिनर अलीकडे खूपच चांगली कामगिरी करत आहेत. मुरलीधरनचा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट काढण्याचा विक्रम आहे यामध्ये तो असाही म्हणाला कि अश्विन ‘स्मार्ट क्रिकेटर’ आहे.

मुरलीधरन म्हणतो, ” अश्विनने अलीकडच्या काळात स्वतःच्या कामगिरीत खूप सुधारणा केली असून तो उत्तम कामगिरी बजावत आहे. त्याच्याकडे अनुभव आणि चांगली प्रतिभा असून येणाऱ्या मालिकेत ती पाहायला मिळेल. माझ्या मताप्रमाणे तो स्मार्ट क्रिकेटर आहे आता पाहू यापुढील सामन्यात तो कसा खेळ करतो. ”

बीसीआयने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघावरील बंदी उठवून दोन वर्षांनंतर पुन्हा या संघाना आयपीएलमध्ये समाविष्ट करण्याचे घोषित केले. यावर मुरलीधरन म्हणतो दोन वर्षानंतर चेन्नई संघात मला पुन्हा संधी भेटल्यास मला आनंदच होईल मी त्याचे मोठ्या उत्साहाने त्याचे स्वागत करेल.

२६ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेच्या कसोटी मालिकेसाठी भारताच्या १६ खेळाडूच्या संघामध्ये रविचंद्रन अश्विनचा देखील समावेश आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी विराट कोहली कर्णधार असून तीन कसोटी,पाच एकदिवसीय सामने आणि एक टी -२० असा हा दौरा असणार असून अनुक्रमे गॅले, कोलंबो आणि कॅंडी येथे सामने खेळले जातील.