मोठी बातमी – मुंबईकर रोहित शर्मा, आर अश्विन पर्थ कसोटीला मुकणार

पर्थ। उद्यापासून (14 डिसेंबर) भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे खेळवला जाईल.

पण या सामन्याआधीच भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. भारताचा मधल्या फळीतील फलंदाज रोहित शर्मा आणि फिरकीपटू आर अश्विन दुखापतीमुळे पर्थ कसोटीला मुकणार आहेत.

आज बीसीसीआयने पर्थ कसोटीसाठी 14 सदस्य संघ जाहीर केला आहे. या संघात हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांना संधी देण्यात आली आहे.

अश्विनला पोटाच्या स्नायूंना ताण आला आहे तर रोहितला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे. त्यामुळे या दोघांनाही पर्थ कसोटीला मुकावे लागणार आहे. याआधी अश्विनला या दुखापतीचा त्रास इंग्लंड दौऱ्यातही झाला होता.

तसेच भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉही दुखापत ग्रस्त आहे. शॉला कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध सराव सामन्यात डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली आहे. यातून तो आजून सावरत आहे. त्यामुळे तो मेलबर्न कसोटीत पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

या तिघांच्या दुखापतीबदद्ल बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘शॉ दुखापतीतून सावरत आहे. पण अजूनही त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अश्विनला डाव्या बाजूला पोटाच्या स्नायुंना ताण आला आहे. त्याच्यावरही उपचार सुरु आहेत. रोहित शर्माला अॅडलेड कसोटीत क्षेत्ररक्षण करताना पाठीची दुखापत झाली आहे. त्यामुळे हे पर्थ कसोटीतून बाहेर पडले आहेत. ‘

पुढे म्हटले आहे की ‘त्याच्यावर संघ व्यवस्थापक लक्ष ठेवून आहेत. तसेच त्यांची तिसऱ्या कसोटीसाठीची उपलब्धतेचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल.’

पर्थ कसोटीसाठी असा आहे १३ जणांचा संघ-

विराट कोहली(कर्णधार), के एल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), हानुमा विहारी, रिषभ पंत(यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.

महत्त्वाच्या बातम्या:

गेल्यावर्षी आयपीएलमध्ये १२ कोटी मिळालेल्या स्टार खेळाडूला केवळ दीड कोटीच मिळणार?

द वाॅल द्रविडपेक्षाही कोहलीची वाॅल होणार विराट, जाणून घ्या काय आहे कारण

आजपर्यंतची विराट कोहलीची एवढी मोठी चूक कुणीच दाखवून दिली नव्हती