टीम इंडियाचे हे दोन प्रमुख खेळाडू मेलबर्न कसोटीला मुकणार ?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात होणारा तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहे.

त्यातच पर्थ कसोटीनंतर भारताच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आधीच भारताला सलामीवीरांची चिंता भासत असताना फिरकीपटू आर अश्विनही त्याच्या दुखापतीतून सावरला नाही असे वृत्त आले आहे. जर तो संघात नाही तर रविंद्र जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. पण तो ही पुर्णपणे फिट नाही.

पहिल्या कसोटी सामन्यात खेळल्यानंतर अश्विनला मांसपेशीमध्ये तणाव जाणवल्याने तो दुसऱ्या कसोटीसाठी मुकला होता. या कसोटीत जडेजाला अंतिम 13 जणांमध्ये स्थान दिले होते. पण त्याचा अकरा जणांच्या संघात समावेश नव्हता.

तसेच जडेजाने पण ही मालिका सुरू होण्याआधी खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. प्रशिक्षक रवी शास्त्री दोघांच्याही फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. तर आज (23 डिसेंबर) अश्विनची फिटनेस चाचणी होणार असून त्यांनतर कळेल की तो तिसऱ्या कसोटीसाठी तयार आहे की नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १९- मुंबईचा ९११

योगाचार्य होण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू सोडणार होता क्रिकेट

या व्यक्तीच ऐकलं तर अश्विन येऊ शकतो तिसऱ्या कसोटीत ओपनिंगला