रवींद्र जडेजाचे खणखणीत अर्धशतक, भारत ९ बाद ५९८

कोलंबो: येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारत मजबूत स्थितीत आहे.अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने वृद्धिमान सहा आणि अश्विन पाठोपाठ येथे अर्धशतक झळकावले.

यावेळी जडेजाने आपल्या खास शैलीत अर्धशतकाचा आनंद व्यक्त केला.

जडेजाचे हे कसोटीमधील ८वे अर्धशतक असून भारताकडून या पहिल्या डावात केएल राहुल, आर अश्विन आणि वृद्धिमान सहा यांनी अर्धशतके तर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतके केली आहेत.

भारताने ५०० धावांचा टप्पा पार केला असून सध्या भारत ५९८/९ अशा सुस्थितीत आहे.