Video: असा झाला रवींद्र जडेजा वाढदिवस साजरा !

भारताचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाचा आज २९ वा वाढदिवस आहे. आजच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात जडेजा खेळत असल्याने सामना संपल्यावर भारतीय संघाने त्याचा वाढदिवस साजरा केला.

त्याच्या या बर्थडे सेलेब्रेशनचा व्हिडीओ बीसीसीआयने ट्विटवरवरून पोस्ट केला आहे.

या व्हिडिओत दिसून येत आहे की जडेजाने केक कापल्यावर तो केक कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा यांना भरवला. जडेजा केक भरवत असतानाच त्याच्या चेहेऱ्याला बाकीच्या संघ सहकाऱ्यांनी केक लावला. केक लावण्यात अजिंक्य रहाणे सर्वात पुढे होता.

जडेजाने आज या वर्षातील शेवटचा अंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. आता तो थेट ५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळेल. त्याने या वर्षात कसोटीत एका वर्षात ५० बळी घेण्याचा टप्पाही पार केला आहे.

जडेजाला त्याच्या वाढदिवसानिमित्त आयसीसी, बीसीसीआयनेही शुभेच्छा दिल्या आहेत.