कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी घडलेल्या त्या गोष्टीबद्दल जडेजाने केला खुलासा

सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या राजकोट येथील मैदानात विंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यत रविंद्र जडेजाने शानदार शतक झळकावले. जडेजाचे कसोटी कारकिर्दीतील पहिलेच शतक होते. रविंद्र जडेजाने खऱ्या अर्थाने पहिल्यांदा कसोटीत अष्टपैलू कामगिरी केली.

जडेजाने  2012  मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत पदार्पण केले होते. जडेजा शतक करण्यासाठी जवळजवळ 6 वर्षाचा कालावधी लागला  आहे.

विंडिजविरूद्ध सध्या चालू असलेल्या कसोटी सामन्यात एक मजेशीर किस्सा घडला. आर अश्विन डावातील 12 व्या षटकात गोलंदाजी करत होता. त्यावेळी या षटकातील चौथ्या चेंडूवर हेटमेयरने सरळ मिड-आॅनच्या दिशेने फटका मारला. पण तो चेंडू सरळ जडेजाच्या हातात गेला.

याचवेळी नॉन स्ट्रायकर एन्डला असणाऱ्य़ा सुनील अम्ब्रिस हेटमेयरकडे धावला तर हेटमेयरचे त्याकडे लक्ष नव्हते.

त्यामुळे दोन्ही फलंदाजांना एकाच एन्डला पाहुन जडेजाने चेंडू गोलंदाज अश्विनकडे फेकण्याऐवजी स्वत:च स्टंपच्या दिशेने चालू लागला. या संधीचा फायदा घेण्यासाठी हेटमायर जोरात धावला. जडेजाला विराट कोहली आणि आर आश्विनने ओरडून सांगितले. शेवटच्या क्षणी जडेजाला भान आले आणि त्याने चेंडू थेट स्टंपवर फेकला.

खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना जडेजाने सांगितले की ‘चेंडू यष्टींना लागेल याचा मी विचार केली नव्हता पण तो नशिबाने लागला’.

महत्वाच्या बातम्या-