तलवारबाजी स्टाईल सेलिब्रेशनसह राजकोट बाॅय जडेजाचा खास विक्रम

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आपला पहिला डाव १४९.५ षटकांत ९ बाद ६४९ धावांवर घोषीत केला. यात पृथ्वी शाॅ (१३४), विराट कोहली (१३९) आणि रविंद्र जडेजा (नाबाद १००) यांनी शतकी खेळी केल्या.

यातील पहिला डाव घोषीत करण्यापुर्वी एक चेंडू आधी जडेजाने आपले शतक पुर्ण केले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले.

तब्बल ५५ कसोटीत डावात वाट पाहिल्यावर जडेजाला आपले हे पहिलेवाहिले खास शतक आपल्या घरच्या मैदानावर करता आले. यामुळे हे शतक अनेक अर्थांनी खास ठरले. यावर्षी शतक करणारा जडेजा ७वा भारतीय ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-रिषभ पंत आणि षटकारांच नातं काही खास

दुसऱ्या दिवशी काही मिनीटांतच कोहलीचा कसोटीत भीमपराक्रम

विंडीज विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी

वन-डे जबरदस्त गाजवणाऱ्या या खेळाडूला हवे आहे कसोटी संघात स्थान

विराट की रोहित? कोण आहे टीम इंडियाचा जबरदस्त कर्णधार