रविंद्र जडेजासह १९ खेळाडूंची झाली अर्जून पुरस्कारासाठी निवड, दीपा मलिक, बजरंग पुनियाला खेलरत्न

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची 2019 च्या अर्जून पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जडेजासह विविध क्रिडा क्षेत्रातील 19 खेळाडूंची पुरस्कार निवड समीतीने अर्जून पुरस्कारासाठी निवड केली आहे.

याबरोबरच पॅरा ऍथलिट दीपा मलिक आणि कुस्तीपटू बजरंग पुनियाची ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ या देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने(बीसीसीआय) मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि पुनम यादव या चार क्रिकेटपटूंची 2019 च्या अर्जून पुरस्कारासाठी शिफारस केली होती. यांमधील जडेजा आणि पुनम यादव या भारताच्या दोन क्रिकेटपटूंना यावर्षी हा पुरस्कार मिळणार आहे.

मागील वर्षी स्म्रीती मानधनाला या भारताच्या महिला क्रिकेटपटूला अर्जून पुरस्कार मिळाला होता.

जडेजाने मागील अनेक दिवसांपासून चांगली कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप सोडली आहे. त्याने मागील महिन्यात इंग्लंडमध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध बिकट परिस्थितीत फलंदाजीला येत 59 चेंडूत 79 धावा केल्या होत्या.

तसेच त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आत्तापर्यंत 156 वनडे, 42 टी20 आणि 41 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 2128, 135 आणि 1485 धावा केल्या आहेत. तसेच त्याने वनडेत 178, टी20मध्ये 32 आणि कसोटीत 192 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याचबरोबर पुनमने तिच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 1 कसोटी सामना खेळताना 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर 41 वनडे सामने खेळताना 63 विकेट्स घेतल्या आहेत.

खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या दीपाने 2016 च्या रिओ पॅरा-ऑलिम्पिकमध्ये गोळाफेकीत रौप्य पदक मिळवले होते. तसेच 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये भालाफेकीत कांस्य पदक जिंकले होते.

तिच्यासह खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या बजरंग पुनियाने 2018 ला झालेल्या एशियन गेम्स तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: स्टिव्ह स्मिथचा हा ‘मनोरंजक’ फलंदाजीचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

संदीप नरवाल प्रो कबड्डीमध्ये अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच खेळाडू

या ५ निकषांच्या आधारावर शास्त्रींची झाली टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी फेरनिवड