कोहलीने जडेजाला बनवलं वेगवान गोलंदाज

भारतीय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वादाच्या बातम्या जरी रोज येत असल्या तरी भारतीय संघाने आणि विशेषकरून विराट कोहलीने भारत पाकिस्तान सामन्याला किती महत्त्व दिले आहे याच एक नवं उदाहरण समोर आलं आहे.

भारतीय कर्णधार आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेची सुरुवात विजयाने करू इच्छितो. परंतु पाकिस्तानकडे मोठी वेगवान गोलंदाजांची फौज आहे. त्यात मोहम्मद आमिर, जुनैद खान और वहाब रियाज असे आग ओकणारे दिग्गज गोलंदाज आहेत. यांचा सामना नीट करता यावा म्हणून विराटने एक नवीन क्लुप्ती लढवली. डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाला डावखुऱ्या हाताने वेगवान गोलंदाजी करायला विराटने सांगितले. नेट प्रॅक्टिसमध्ये जडेजानेही विराट आणि अन्य भारतीय फलंदाजांना डावखुऱ्या हाताने वेगवान गोलंदाजी केली.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना उद्या अर्थात ४ जून रोजी दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे.