त्या गोष्टीवरून कोहलीने केली होती मजाक: रवींद्र जडेजा

काही दिवसांपूर्वी विराट आणि जडेजाचा एक फोटो सोशल मीडिया वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता ज्यात विराट कोहली जडेजाची त्याच्या नवीन केशरचनेवरून मजाक उडवत आहे असे दिसत होते.
परंतु जडेजाने स्वतःच पुढे येऊन १८ एप्रिल रोजी राजकोट येथे झालेल्या गोष्टीचे स्पष्टीकरण दिले आहे.

 

हा फोटो त्यावेळी काढला गेला जेव्हा मला विराटने राजपूत म्हणून हाक मारली. विराट मला राजपूत म्हणून हाक मारतो. आता तर त्याने माझे टोपण नावच राजपूत ठेवले आहे. तो जेव्हा मला या नावाने बोलावतो तेव्हा मला त्या गोष्टीचा गर्व वाटतो. विराट मला भावासारखा आहे आणि आमच्यात अशी मजाक सुरूच असते.

 

गुजरात विरुद्ध बेंगलोर हा सामना १८ एप्रिल रोजी झाला होता. त्यात जडेजा प्रथमच एकदम वेगळ्या लूक्स मध्ये आला होता.