रविंद्र जडेजाने जबरदस्त थ्रो करत केले रॉस टेलरला धावबाद, पहा व्हिडिओ

मँचेस्टर। 2019 क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला उपांत्य सामना आज राखीव दिवशी सुरु झाला आहे. आज या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 239 धावा केल्या आहेत.

हा सामना काल पावसाच्या व्यत्ययामुळे न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना 46.1 षटकात 5 बाद 211 धावांवर थांबला होता. पण आज याच धावसंख्येवरुन हा सामना पुढे सुरु झाला होता. आज न्यूझीलंडकडून रॉस टेलर आणि टॉम लॅथमने सुरुवात केली.

पण 48 षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने 74 धावांची खेळी करणाऱ्या टेलरला जबरदस्त थ्रो करत धावबाद केले आहे. या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील टाकलेला शेवटचा चेंडू टेलरने मिडविकेटच्या दिशेने फटकावला आणि दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला.

पण टेलर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना डीप स्केअरलेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या रविंद्र जडेजाने चेंडू आडवत स्ट्रायकर एन्ड्सच्या दिशेला थेट स्टम्पवर फेकला. त्यामुळे टेलरला बाद झाला. जडेजाचा हा थ्रो पाहुन सर्वजण थक्क झाले होते.

विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच चेंडूवर जडेजाने लॅथमचा मिड ऑनला हवेत उडी मारत झेल घेतला आणि न्यूझीलंडला सातवा धक्का दिला.

जडेजाने या विश्वचषकात 2 सामन्यात खेळताना क्षेत्ररक्षणात भारतासाठी तब्बल 41 धावा वाचवल्या आहेत. त्यामुळे तो या विश्वचषकात क्षेत्ररक्षण करताना सर्वाधिक धावा वाचवणारा खेळाडू देखील ठरला आहे.

सध्या भारतीय संघ न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला आहे. पण भारताची सुरुवात खराब झाली आहे. भारताने पहिल्या 5 विकेट्स 23 व्या षटकातच 71 धावांवर गमावल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

संघात एकवेळ स्थान न मिळालेल्या जडेजाने संघासाठी वाचवल्या ४१ धावा

लिटिल मास्टर गावसकरांचे चालू सामन्यात चक्क अंपायरने कापले होते केस!

कसोटीत १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूने केले होते मराठी चित्रपटात काम