रवींद्र जडेजाच्या हॉटेलवर छापा 

राजकोट महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या हॉटेलवर छापा मारला. यात जडेजाच्या हॉटेलमध्ये न खाण्यायोग्य पदार्थ सापडल्याची बातमी आहे.

अहमदाबाद मिररमधील एका वृत्तानुसार राजकोटमध्ये ज्या तीन हॉटेलवर आरोग्य विभागाने छापा मारला हे हॉटेल त्यातील एक आहे.

याच वृत्तानुसार आरोग्य विभागाने ते पदार्थ नष्ट केले आहेत तसेच हॉटेलला नोटीसही पाठवली आहे.

येथील पदार्थ हे अनेक दिवस तसेच होते. त्यावर कोणतीही तारीख नव्हती. तसेच काही काही पदार्थांना बुरशी लागली होती.

जडेजाच्या हॉटेलचे नाव जड्डूज फूड फील्ड असे असून त्याची बहीण नैना याचे सर्व व्यवस्थापन पहाते.

भारतात अनेक क्रिकेटपटूंची स्वतःची हॉटेल आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान बरोबर जडेजाचाही समावेश आहे.

सध्या जडेजा संघाबाहेर आहे. श्रीलंका दौऱ्यात दुसरा कसोटी सामना हा जडेजाचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असून त्यांनतर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही.