जडेजाने संतापून केले हे ट्विट !

भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने बीसीसीआयने काल निवडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीच्या संघाबद्दल ट्विट करून संताप व्यक्त केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेच्या पहिल्या ३ सामन्यांसाठी काल संघ निवडण्यात आला, ज्यात जडेजा आणि अश्विन या दोघांना स्थान देण्यात आले नाही. जडेजाने लगेचच हे ट्विटला हटविले, ज्यात संघात न घेतल्यामुळे त्याची नाराजी स्पष्ट दिसत होती.

“ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठीच्या संघाची निवड रोटेशन पॉलिसीच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. त्यानुसार आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे,” असे मुख्य निवड समितीचे एमएसके प्रसाद यांनी सांगितले.

त्यानंतर जडेजाने हा ट्विट केला होता. सोशल मीडियावर असणाऱ्या क्रिकेटप्रेमींनी मात्र याचा स्क्रीनशॉट लगेच ट्विट केला.

पहिल्या ती वनडे साठी निवडण्यात आलेला संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, हरदीप पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यज्वेंद्र चहल, जसप्रित बूमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी