जडेजाने दिले या दोन खेळाडूंना नंबर १ बनण्याचं श्रेय

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा सध्या आयसीसी कसोटी गोलंदाज आणि अष्टपैलू अशा दोनही क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. कालच जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत जड्डू अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला तर तो आधीपासूनच गोलंदाजी क्रमवारीत अव्वल होता.

याचे सर्व श्रेय जडेजाने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहलीला दिले आहे. त्यासाठी त्याने आपल्या अधिकृत ट्विटर माध्यमाचा सहारा घेतला आहे.

एक खास ट्विट जडेजाने यासाठी केला आहे. त्यात त्याने एक खास कोलाज बनवले आहे. ज्यात जडेजाने पारंपरिक राजपूत पोशाख घातला आहे. दुसऱ्या फोटोत धोनी आणि विराट आहेत. तर तिसऱ्या फोटोत जडेजा १ नंबर असे बोटाने दाखवत आहे.

जडेजा ट्विटमध्ये म्हणतो, ” आयसीसी कसोटी गोलंदाज आणि अष्टपैलू क्रमवारीत पहिल्या स्थानावर येणे हे केवळ एमएस धोनी, विराट कोहली, माझे चाहते, माझे कुटुंब, बीसीसीआय आणि आयसीसीमुळे शक्य झाले. #टीमइंडिया #राजपूतबॉय.