२०१९ च्या आयपीएलमध्ये बेंगलोरचा विकेटकिपर खेळणार मुंबईकडून

मुंबई। 2019 च्या आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटॉन डीकॉकला संघात सामील करुन घेतले आहे. डीकॉकचे हे हस्तांतर ऑल मनी ट्रेडच्या नुसार करण्यात आले आहे.

डीकॉकला बेंगलोरने 2018 च्या आयपीलसाठी 2.8 कोटी रुपये देऊन संघात सामील करुन घेतले होते. त्यामुळे मुंबईनेही त्याला तेव्हढेच रुपयांना खरेदी केले आहे.

डीकॉकला मुंबईने संघात सामील करण्याबरोबरच मुस्ताफिजुर रहमान आणि अकीला धनंजया डी सिल्वा यांना मुक्त केेले आहे. मुंबईने मुस्तफिजुरला 2.2 कोटी आणि अकीला धनंजयाला 50 लाख रुपयात खरेदी केले होते.

मुंबई इंडियन्सच्या संघात आधीच इशान किशन आणि आदित्य तारे हे यष्टीरक्षक फलंदाज आहेत. त्यामुळे कदाचित डीकॉकला वरच्या फळीत फक्त फलंदाज म्हणून खेळवण्याच्या दृष्टीने मुंबईने त्याला संघात सामील करुन घेतले असण्याची शक्यता आहे.

डीकॉकने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 34 सामने खेळले असून 1 शतक आणि 6 अर्धशतकासह 28.09 च्या सरासरीने 927 धावा केल्या आहेत. तसेच मागील वर्षी बेंगलोरकडून खेळताना त्याने 8 सामन्यात 25.12 च्या सरासरीने 201 धावा केल्या होत्या.

डीकॉक आयपीएलमध्ये बेंगलोर बरोबरच दिल्ली डेअरडेविल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद या संघाकडूनही याआधी खेळला आहे.

आयपीएल संघांच्या फ्रेंन्चायझींना 2019 च्या आयपीएलसाठी संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंची आणि मुक्त करणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यासाठी 15 नोव्हेंबर ही अंतिम तारिख आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एमएस धोनीला हा ‘कुल’ विक्रम करत सचिन, द्रविडच्या यादीत सामील होण्याची संधी

रिषभ पंतचे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण; पहिल्या वनडेसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडीया

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग ११- पृथ्वी शॉ नावाचा हिरा शोधणारा जवाहिरी..