आयपीएल 2018: बेंगलोरचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

मुंबई| आज आयपीएल 2018 चा 14 वा सामना  मुंबई इंडियन्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघात होणार आहे. या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या दोन्ही संघानी आत्तापर्यंत तीन सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सला या तीनही सामन्यात पराभव मिळाल्यामुळे ते गुणतालिकेत सगळ्यात खाली आहेत. तसेच बँगलोरचा संघ पण तीन पैकी दोन सामन्यात पराभूत झाला आहे. 

त्यामुळे आजच्या सामन्यातून हे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. 

असे आहेत 11 जणांचे संघ:

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार ), जसप्रीत बुमराह, सुर्यकुमार यादव, ईशान किशन , एविन लेवीस, मंयक मरकंडे, मिशेल मॅकलॅंघन, मुस्फिजूर रहमान, हार्दीक पांड्या, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड.

रॉयल चॅलेंजर बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार ), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस वोक्स, ब्रेंडन मॅक्युलम, क्विंटॉन डी कॉक, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मंदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, सर्फराज खान, मोहम्मद सिराज