IPL 2018: बेंगलोर की कोलकाता, विजयाच्या मार्गावर कोण परतणार?

बेंगलोर।  आजचा आयपीएलमधील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा रंगणार आहे. हा सामना बेंगलोरमध्ये असून त्याला रात्री 8 वाजता सुरूवात होणार आहे. 

या मोसमात बेंगलोरने 6 पैकी 2 सामने जिंकले आहेत तर कोलकाताने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत.

बेंगलोरने मागील सामन्यात चेन्नई विरूध्द 205-8 धावा केल्या होत्या. मात्र अंबाती रायडू आणि एम एस धोनीने त्यांच्या विजयाच्या आशांवर पाणी फिरवले होते. दुसरीकडे कोलकाता पण पंजाबकडून 9 विकेट्सने आणि दिल्लीकडून 55 धावांनी अशा सलग दोन सामन्यात पराभूत झाला आहे.

आजच्या सामन्यात गोलंदाजीत कोलकाताकडून सुनिल नारायण, पियुष चावला आणि कुलदिप यादव तर बेंगलोरकडून उमेश यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यावर महत्वाच्या भूमिका पार पाडण्याची जबाबदारी असेल.

बेंगलोरला फंलदाजीत विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ब्रेंडन मॅक्युलम, क्विंटॉन डी कॉक आणि मंदीप सिंग असे अनेक उत्कृष्ठ पर्याय आहेत. 

कोलकाताकडून दिनेश कार्तिक, रॉबीन उथप्पा आणि अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आणि नितीश राणा या खेळाडूंनी आत्तापर्यंत चांगली  फंलदाजी केली आहे. 

हे दोन संघ 8 एप्रिलला कोलकातामध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी  कोलकाताने बेंगलोरला 4 विकेट्सने पाभूत केले होते.

बेंगलोरमध्ये झालेल्या मागच्या चार सामन्यांत पहिली फंलदाजी करणाऱ्या संघांनी 155, 217, 174 आणि 205 धावांचे असे लक्ष्य प्रतिस्पर्धी संघांना दिले होते. या चार सामन्यांपैकी तीन सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत. 

कधी होईल आयपीएल २०१८ मधील  रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा  २९वा सामना आज, २९ एप्रिलला होणार आहे.

कुठे होईल आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजचा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे होईल.

किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.

कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.

आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.

यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार ), एबी डिव्हिलियर्स, ख्रिस वोक्स, ब्रेंडन मॅक्युलम, क्विंटॉन डी कॉक, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मंदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, सर्फराज खान, मोहम्मद सिराज, मोईन अली कोरे अॅण्डरसन, मुरूगन अश्विन, अनिकेत चौधरी, कोलीन डी ग्रॅनधोमे, पवन देशपांडे, अनिरूध्द जोशी, कुलवंत खेर्जोलिया, पवन नेगी, पार्थिव पटेल, नवदिप सैनी, टीम साउथी, मनन वोहरा

कोलकाता नाईट रायडर्स: दिनेश कार्तिक (कर्णधार),रॉबीन उथप्पा, आंद्रे रसेल, ख्रिस लीन, पियुष चावला, कुलदिप यादव, मिशेल जॉन्सन, सुनिल नारायण, शुभम गील, इशांक जग्गी, कमलेश नागरकोती, नितीश राणा, विनय कुमार, अपुर्व वानखाडे, रिंकू सिंग, शिवम मवी, जॅवोन सर्लस, कॅमरॉन डेलपोर्ट, टॉम कुरान 

महत्त्वाच्या बातम्या –

– राफेल नदालने क्ले कोर्टवरील 400 वा विजय साजरा करत रचला मोठा विक्रम

ऑस्ट्रेलियाच्या या शहरातून मिळाले ३ विश्वचषक विजेते खेळाडू

IPL 2018: आज राजस्थान-हैद्राबाद आमने-सामने

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४- दैव देते, कर्म नेते!!

‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीने केला हा खास विक्रम