बार्सिलोनाचा रियल मॅद्रिदवर विजय

0 23

मियामीमध्ये येऊन पोहचलेल्या इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये आज क्लासीकोचा थरार सर्व फुटबाॅल फॅन्ससाठी रविवारची उत्तम सुरुवात देऊन गेला. फ्रेंडली असली तरी तेवढीच उत्सुकता या सामन्याची होती.

रियल मॅद्रिदचा स्टार रोनाल्डोच्या अनुपस्थितित बार्सालोना संघाने ३-२ असा विजय मिळवला आणि इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपवर आपले नाव कोरले. बार्सालोनातर्फे मेस्सी (३) राकीटीक (७) आणि पिके (५०) ने तर रियल मॅद्रिदतर्फे कोवाकीक (१४) आणि मार्को (३६) ने गोल केले.

पहिल्या हाफच्या सुरुवातीलाच १० मिनिटांमध्ये बार्सालोनाने २ गोल करुन सामन्यावर पकड ठेवायचा प्रयत्न केला पण काही वेळातच रियल मॅद्रिदने गोल करत बरोबरी साधली.

दुसऱ्या हाफला ५ मिनिट झालेले असताना नेमारच्या फ्री किकवर पिकेने गोल करत ३-२ अशी बढत मिळवून दिली. नेमारने ३ सामन्यात ३ गोल, २ असिस्ट केले आहेत.

नेमार रुमर्स: 

नेमारच बार्सालोना मधील भविष्य काही दिवसातच स्पष्ट होईल. ट्रान्सफरमधील सर्वात जास्त चर्चेचा विषय असलेला नेमार पॅरिस सेंट जर्मन (PSG) ला जाणार का हाच आहे. त्याचा रिलीझ क्लॅाझ २२० मिलियनचा आहे आणि तो जर त्या संघात गेलाच तर नियमानुसार दुसरा खेळाडू ज्याची किंमत १०० मिलियन आहे तो खेळाडू पॅरिसला बार्सालोनाला द्यावा लागेल. तो बार्सालोनाचा या वर्षीचा फेवरेट टार्गेट मार्को वेरात्ती असेल का यावर पण सगळ्यांच लक्ष आहे.

-नचिकेत धारणकर (टीम महा स्पोर्ट्स)

Comments
Loading...
%d bloggers like this: