बरोबरीमुळे ‘ला लिगा’ मध्ये माद्रिद पाचव्या क्रमांकावर ..

स्पॅनीश लीगमध्ये शनिवारी रात्री स्पॅनीश चॅम्पियन रियाल माद्रिदचा सामना लिव्हाण्टे या संघाशी झाला. अवे सामना खेळणाऱ्या माद्रिदने हा सामना १-१ असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. माद्रिद संघासातील ब्राझीलियन मिसफिल्डर मार्सेलो याला सामन्याच्या ८८च्या मिनिटाला रेड कार्ड मिळाले. शेवटची काही मिनिटे माद्रिद संघाला दहा खेळाडूनीशी खेळावे लागले.

घरच्या मैदानावर खेळत असणाऱ्या लिव्हाण्टे संघाने माद्रिद संघाला बरोबरीची टक्कर दिली. सामन्यातील पहिली काही मिनिटे लिव्हाण्टे संघाचा सामन्यात दबदबा राहिला. ११ व्या मिनिटाला सामन्याचा पहिला गोल लिव्हाण्टे संघाने केले. या अनपेक्षीत धक्क्यातून सावरत माद्रिद संघाने प्रतिआक्रमणे केली. याचा संघाला फायदा झाला. माद्रिदला कॉर्नर मिळाला. या कॉर्नरवर माद्रिदचा कर्णधार सर्जिओ रामोसने हेडर केला. तो हेडर रोखण्यात लिव्हाण्टे संघाचा गोलकीपर राउल याला पूर्ण यश मिळाले नाही. रिबाउंड वर माद्रिदच्या लुकास वेजकुइजने गोल करत सामना १-१ असा केला होता. लुकास वेजकुइज याचा माद्रिदसाठीचा हा पहिलाच गोल होता. पहिले सत्र संपले तेव्हा सामना १-१ असा बरोबरीत होता.

सामन्याच्या दुसर्या सत्रात एकही गोल झाला नाही. माद्रिद संघाने दुसऱ्या सत्रात गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या परंतु ते गोल करण्यात अपयशी ठरले. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत माद्रिद संघाचा भार पेलण्यात गॅरेथ बेल अपयशी ठरला. त्याने गोल करण्याच्या अनेक संधी सोडल्या.

सामन्याच्या ८८ व्या मिनिटाला मार्सेलोने उत्तम चाल रचली त्याने गोल वर फटका मारला. त्याचा तो प्रयन्त अपयशी ठरला. हा प्रयन्त करते वेळी त्याचा तोल गेला आणि विरोधी खेळाडूला धडक दिली यामुळे दोन्ही खेळाडू खाली पडले. त्याने खाली पडल्यानंतर विरोधी खेळाडूच्या डोक्यात किक केली. त्यामुळे रेफरीने त्याला रेड कार्ड दाखवत मैदानाबाहेर केले.

९० मिनिटे झाल्यावर ४ मिनिटे त्यांना इंज्युरी टाईम म्हणून देण्यात आली. ९२ व्या मिनिटाला माद्रिदच्या टोनी क्रुसने मारलेला फटका गोल पोस्टच्या खांबाला लागला आणि गोल होऊ शकला नाही.इंज्युरी टाईममध्ये कोणताही संघ गोल करू शकला नाही. त्यामुळे हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला.

जर तुम्हाला माहिती नसेल तर-
माद्रिदचा संघ स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो शिवाय खेळात आहे. स्पॅनीश सुपर कपच्यासामन्यात रेफ्रीला धक्का दिल्यामुळे शिस्तभंगाची कार्यवाही झाली आहे.त्याला चार सामने खेळण्यास बंदी आहे. माद्रिदचा होणार पुढील सामना चौथा सामना असेल त्यानंतर तो संघाला उपयुक्त असेल.

नवीन मोसमात माद्रिद सामानाने तीन सामने खेळले असून त्याची फक्त एक सामना त्यांनी जिंकला आहे. बाकीचे दोन सामने त्यांनी बरोबरीत सोडवले आहेत. माद्रिदचा संघ ला लीगामध्ये तीन सामन्यात पाच गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.